निर्भीडसत्ता न्यूज –
स्वाईन फ्ल्यू आजाराचे थैमान शहरात वाढत असून चिंचवडमधील एका ८० वर्षीय ज्येष्ठ महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. चालु वर्षातील शहरात स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २७ वर पोहचली आहे.
ज्येष्ठ महिला चिंचवडच्या शाहूनगरमधील रहिवाशी आहेत. त्यांना १८ जुलै रोजी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना महिलेचा शनिवारी मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरात आणखी चार स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. १४ जणांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. जानेवारीपासून आत्तापर्यंत शहरात २७ रुग्ण स्वाईन फ्ल्यूमुळे दगावले आहेत. आजअखेर २०८ रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.