निर्भीडसत्ता न्यूज –
लसिद्धीविनायक प्रतिष्ठाण व कोकण प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड यांच्या माध्यमातून गौरी गणपती सणाकरीता निगडी येथून कोकणवासियांसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहे, त्यासाठी बुकींग सुरु करण्यात आली आहे.
निगडी येथून बुधवार दि. २३ ऑगस्ट व २४ ऑगस्ट रोजी कणकवली, सावंतवाडी, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, देवगड, राजापूर मार्गे जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
तरी सर्व कोकणवियांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकण प्रवासी संघाचे अध्यक्ष दादा हटले, जयेश भुवड, बबन दळवी, मिथुन चव्हाण यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२१६९७०५०, ८६०५४२७६८० या क्रमांकावर संपर्क साधावा.