निर्भीडसत्ता न्यूज –
शहरात स्वाइन फ्लूने ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५२ वर पोहचली आहे.
कासारवाडी येथील ३६ वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून १६ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लूचा त्रास वाढल्याने त्या महिलेला त्याच दिवशी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला. तर, आणखी तीन नवीन स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले आहेत. आजअखेर रुग्णांची संख्या ३८१ झाली आहे. तसेच, तर्दी, ताप, खोखला या आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या शहरात वाढली आहे.