निर्भीडसत्ता न्यूज –
जांभळामध्ये ग्लायकोसाइड हा घटक असल्यामुळे जांभळाच्या बिया स्टार्चचे शर्करेत रुपांतर होऊ देत नाहीत. यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित राहून इन्सुलिनचे संरक्षण होते. जांभळामधील काही घटकांमुळे हृदयविकार व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या विकारापासून बचाव होतो.
रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी सकाळी 5-6 जांभळे खावीत किंवा कोमट दूध/पाण्यात एक चमचा जांभळाच्या बियांची पूड मिसळून दररोज प्यावे. या घरगुती उपायांबरोबरच तुम्ही योगासने करूनही मधुमेहावर नियंत्रण करू शकता