निर्भीडसत्ता न्यूज –
पालकमंत्री गिरीश बापट यांनी शाळेतील कार्यक्रमात विद्यार्थीनींसमोर केलेल्या वक्तव्याचा शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, माजी उपमहापौर विश्रांती पाडळे, माजी नगरसेविका शकुंतला भाट, शिक्षणमंडळ सदस्या लता ओव्हाळ, कविता खराडे, वर्षा शेडगे, दिपाली देशमुख, सविता धुमाळ, नेहा हाडावळे, मंदाकिनी गायकवाड आदी उपस्थित होते.
वैशाली काळभोर म्हणाल्या, पाकमंत्री बापट यांना महिलांबद्दल किती आदर आहे, हे समजले असून त्यांना शिकवनी देण्याची गरज आहे. सांस्कृतिक शहरात असे वक्तव्य योग्य नाही. पालकमंत्र्यांना समजाविण्याची वेळ यावी, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही.