करून करोडोंचा गफला पुष्कर श्रोत्री लंडनला लपला…
भारतामधून अनेक बडे बडे व्यापारी कोट्यावधींचा गफला करून भारताबाहेर पळून गेले, ते अजूनही सापडले नाहीत परंतु ते नेहमीच मिडीयामध्ये चर्चेत असतात. ह्यात भर पडली आहे ती मराठमोळा अभिनेता पुष्कर श्रोत्री ह्याची. वाचून तुम्हांला कदाचित धक्का बसला असेल, परंतु हा साधा भोळा दिसणारा अभिनेता असा करोडोंचा गफला कसा काय करू शकतो असा प्रश्न नक्कीच तुम्हांला सतावत असेल. पण शिर्षकावर जाऊ नका, ही बातमी आहे पुष्कर श्रोत्रीच्या आगामी चित्रपट ‘ये रे ये रे पैसा २’ची.
अमेय खोपकर निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा २’ ह्या सिनेमात पुष्कर श्रोत्री आपल्याला निरज शहाच्या भूमिकेत दिसणार आहे. ह्या चित्रपटामध्ये पुष्कर श्रोत्री असं म्हणतो की, ‘तुम लोग मुझे इंडिया मै नही पकड पाये तो अब लंडन मै आके क्या करोगे.. ये सारा मेरा पैसा है मेरा पैसा….’. ह्या वरून तरी असं लक्षात येत आहे की, निरज शहा हा भारतातील करोडो रुपये घेऊन लंडनला पळून गेला आहे आणि त्याला असं वाटतंय की भारतात असताना त्याला कोणी पकडू शकले नाही तर आता तो लंडन मध्ये असताना त्याला कोणच पकडू शकत नाही. लवकरच कळेल की निरज शहा नक्की कोण आहे आणि तो भारताचे पैसे घेऊन लंडन मध्ये का गेलाय? येत्या ९ ऑगस्टला हे रहस्य सर्वासमोर उलगडेल.
ह्या चित्रपटात अनेक कलाकार तुम्हांला वेगवेगळ्या रुपात दिसतील. पण पुष्कर श्रोत्री पुन्हा एकदा एका वेगळ्या रंगाढंगात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.