निर्भीडसत्ता न्यूज ।
रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकराना “महापरिनिर्वाण दिना” निमित्त विनम्र अभिवादन” करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते राजेश गायकवाड, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
“शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्काची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत: ची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, अनेक क्षेत्रात अतुल्यनीय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे जनक आहेत” असे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार ह्यांनी उद्गार काढले.
यावेळी अग्निशामक दलाचे कर्तव्यदक्ष कामगार विशाल जाधव आणि नागेश जमादार यांना आपल्या कर्तव्यापुढे प्राण गमवावे लागले. तसेच हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर प्रियांका रेड्डीवर सामूहिक बलात्कार झाला या दोन्ही घटनांसाठी न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल येथील सर्व विदयार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
मेघा भट यांनी सूत्रसंचालन केले व अनुराग यादव यांनी आभार मानले.