पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव येथील 42 वर्षीय सुरक्षारक्षकाचा कोरोनामुळे रविवारी (दि.12) मृत्यू झाला. हा शहरातील कोरोनाचा पहिला बळी आहे. तसेच, कोरोनाचे नवीन 2 रूग्ण आज आढळून आले. शहरातील कोरोना रूग्णांची संख्या आता19 वर पोहचली आहे.
थेरगाव येथे राहत असलेल्या 42 वर्षीय एका सुरक्षारक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तो हिंजवडीत एका कंपनीत कामास होता. मात्र, लॉकडाऊनमुळे कंपनी बंद असल्याने तो घरीच होता. त्याला कोरोनाची लागण कशी झाली, त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. त्रास होऊ लागल्याने त्याला पालिकेच्या चिंचवड दवाखान्यात तपासणीनंतर वायसीएम रूग्णालयात गुरूवारी (दि.9) दाखल करण्यात आले होते. त्याला इतर कोणत्याही आजार नव्हता. कोरोनाचा हा शहरातील कोरोनाचा पहिला बळी आहे.
तसेच, कासारवाडी व दापोडीतील असे दोन पुरूष रूग्णांना कोरोना झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोनाबाधीत एकूण 19 पैकी 16 जणांवर पिंपरीतील वायसीएम रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, उर्वरित 3 जणांवर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.