पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (दि.10) आठ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित 497 नवे रूग्ण आढळून आले. तर, कोरोनाबाधित 168 जण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
नेहरूनगर येथील 60 व 82 वर्षीय दोन महिला, चिंचवडेनगर येथील 80 वर्षीय महिला, पिंपरी गावातील 61 वर्षीय पुरूष, पिंपळे गुरव येथील 42 वर्षीय पुरूष, चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टीतील 42 वर्षीय पुरूष, इंद्रायणीनगर, भोसरी येथील 46 वर्षीय महिला, मोरेवस्ती, चिखली येथील47 वर्षीय पुरूष असे 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 131 झाली आहे.
शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6 हजार 761 वर पोहचली आहे. वायसीएम, भोसरी, पालिका कोविड केअर सेंटर व खासगी रूग्णालयात एकूण 2 हजार 577 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित 168 जण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या 4 हजार 122 इतकी झाली आहे.
आज 1 हजार 415 कोरोना संशयितांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. आज एकूण 923 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर, 2 हजार 382 जणांचे अहवाल येणे अद्याप बाकी आहे.