पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह 749 रूग्णांची नोंद रविवारी (दि.20) झाली. शहरात कोरोनाबाधितांची संख्या 70 हजार 172 वर पोहचली आहे. सक्रिय 5 हजार 375 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील रूग्णालयात 476 रूग्ण दाखल आहेत. कोरोनाबाधित 1 हजार 151 रूग्ण बरे झाले. त्यांना रविवारी (दि.20) विविध कोविड केअर सेंटर व रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत तब्बल 59 हजार 968 रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.
आज 3 हजार 484 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. एकूण 1 हजार 800 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर, अद्याप 2 हजार 897 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत शहरातून एकूण 2 लाख 88 हजार 992 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 2 लाख 15 हजार 923 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उपचारादरम्यान, चिखली, पिंपरी, निगडी, काळेवाडी, चिंचवड, भोसरी, पिंपळे निलख येथील रहिवाशी असलेले 8 रूग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 हजार 142 रूग्ण मरण पावले आहेत. तर, शहराबाहेरील 3 जणांचा मृत्यू झाला असून, त्यांची संख्या 365 वर पोहचली आहे.