निर्भीड न्यूज
रहाटणी –
प्रभाग क्रमांक 48 मधील रहाटणी येथील मथुरा कॉलनीतील रस्ता डांबरीकरण सुरू झाले आहे. नगरसेवक कैलास थोपटे यांच्या हस्ते मंगळवारी या कामाचे उद्घाटन करण्यात आले.
नगरसेविका अनिता तापकीर, युवा नेते कुणाल थोपटे, सखाराम रानवडे, दिनेश देशमुख, आशितोष नखाते, रामदास गोडांबे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक थोपटे या वेळी म्हणाले की, प्रभाग क्र. ४८ मध्ये अंतर्गत कॉलन्यांतील रस्ता डांबरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. वेळोवेळी प्रभागातील नागरी विकासकामांच्या पाठीशी ठाम उभे असतात. प्रभागातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच विकासकामांना गती मिळाली आहे. तापकीरनगर येथील ज्योतिबा कॉलनी आणि कृष्णनगरी येथील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मथुरा कॉलनीतील सुमारे ४०० मीटर रस्त्याच्या कामासही सुरूवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्रमांक ४८ मधील सर्व विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत. नवीन कामांसाठी महापालिकेने बजेट देखील मंजूर केले असल्याचे थोपटे यांनी या वेळी सांगितले.