पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
येथील साई सोशल अॅण्ड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिवसानिमित्त नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रातील अडीचशे महिलांचा गौरव करण्यात आला. गोरगरीबांना कपडे व अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले.
संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात कार्यक्रम झाला. त्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या पिंपरी-चिंचवड, पुणे व राज्यभरातील महिला आणि तरूणींचा नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे, चित्रपट अभिनेते अशित चटर्जी, बॉबी करनानी शिरीन वतसानी, सुनील हिरूलकर, योगेश गोंधळे, संजीव कुमार, निवृत्त कर्नल महादेव घुगे आदी उपस्थित होते.तसेच, गोरगरीब कुटुंबास कपडे व अन्नधान्याच किटचे वितरण करण्यात आले. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज खान यांनी संयोजन केले.