निर्भीड न्यूज –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची पतसंस्थेने सभासद हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. पतसंस्थेकडून देण्यात येणा-या अल्प मुदतीचे कर्ज (तातडीचे कर्ज) मर्यादा 10 हजारांवरून 20 हजार रुपये करण्यात आले आहे. पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष संजय कुटे यांनी याबाबत माहिती दिली.
पतसंस्थेच्या कै. शंकर (आण्णा) गावडे सभागृहात सोमवार, दि. 11 एप्रिल रोजी बैठक झाली. पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजूर्डे, संस्थेचे सचिव चारूशिला जोशी, उपाध्यक्ष दिलीप गुंजाळ, खजिनदार यशवंत देसाई, संचालक हनुमंत लांडगे, अंबर चिंचवडे, आबा गोरे, मनोज माछरे, महाद्रंग वाघेरे, मधुकर रणपिसे, सतीश गव्हाणे, भूषण गावडे, राजाराम चिंचवडे, रमेश चोरघे, महादेव बोत्रे, नथा मातेरे, भगवान मोरे, नंदकुमार घुले, सीमा सुकाळे आणि व्यवस्थापक नंदकुमार कोंढाळकर आदी या वेळी उपस्थित होते.
या अंतर्गत दि. 14 एप्रिल 2016 पासून सभासदांना देण्यात येणारे अल्प मुदतीचे कर्ज (तातडीचे कर्ज) मर्यादा 10 हजारांवरून 20 हजार रुपये करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे; तसेच सध्या प्रचलित असलेल्या दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी पूर्वी नवीन सभासदांकडून एकूण मंजूर कर्ज रकमेच्या 20 टक्के इतके भाग भांडवल कपात करण्यात येत होते. ते 1 मे 2016 पासून 10 टक्के आणि जुन्या सभासदांसाठी 5 टक्के भागभांडवल कपात करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सभासदांना गरजेच्या काळात जास्त कर्ज रोख स्वरूपात मिळणार आहे त्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवकांची पतसंस्थेचे 6 हजार सभासद आहेत तर ठेवी 34 कोटी रुपये व भागभांडवल 48 कोटी रुपये आहे. सतत ‘अ’ दर्जा प्राप्त असणारी शहरातील ही एकमेव पतसंस्था आहे; तसेच कर्जदार सभासदाच्या मृत्यूनंतर पूर्ण कर्जरक्कम माफ करणारी ही महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय कुटे यांनी दिली आहे.