निर्भीडसत्ता न्यूज –
इंग्लड येथे झालेल्या 19 वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत येथील अर्णव दत्ता याने 9 सामन्यांमध्ये 20 गडी बाद करीत उल्लेखनीय कामगिरी केली. यामुळे त्याला स्पर्धेचा मानकरी किताब बहाल करण्यात आला.
पुण्यातील लिजण्ड क्रिकेट क्लबच्या वतीने या इंग्लड दौर्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. माजी रनजी क्रिकेटपटू मानसिंग निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दौरा झाला. इंग्लड येथील स्थानिक क्रिकेट क्लबच्या 19 संघांचा सहभाग होता. संघाने एकूण 9 सामने खेळले.
संघाचा कर्णधार असलेल्या दत्ता याने नेत्रदीपक कामगिरी करीत 9 सामन्यांमध्ये 30 षटक गोलंदाजी करताना सर्वांधिक एकूण 20 गडी बाद केले. त्यातील एका सामन्यात सर्वांधिक 5 गडी बाद करीत संघाचा विजयात महत्वाचा वाटा उचलला. तसेच, 1 हॅट्ट्रिकही नोंदविली. फलंदाजी करताना 30 व नाबाद 40 असा धावाही केल्या. त्याने 5 सामन्यात सामनाचा मानकरी किताब जिंकला.
संघाचा सुरज सिंग याने 100 धावा करीत शतक झळकविले. स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन दत्ता याला स्पर्धेचा मानकरी किताब प्रदान करण्यात आला. दत्ता याने यापूर्वी आंतरराष्ट्रीय दौरे, राष्ट्रीय व राज्य स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.