प्रशिक्षक सागर पुंडे यांनी केले आयोजन
निर्भीडसत्ता न्यूज –
जपान कराटे-डो नोबुकावा हा शितो-रीयोकाई इंडिया आणि या संस्थेचे भारतीय अध्यक्ष नरेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच आंतरशालेय कराटे स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे आंतरशालेय कराटे स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धा देवेंद्र शर्मा, महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकुमार दळवी, कमलेश पांडे, अशोक वेताळ यांनी स्पर्धेेचे नियोजन केले आणि ही स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विद्यांचल स्कूलच्या टीमचा आला. तर द्वितीय क्रमांक जपान कराटे-डो नोबुकावा हा शितो-रीयोकाई इंडियाच्या बोपखेल शाखेचा तर तृतीय क्रमांक ज्ञानज्योती स्कूलचा आला.
240 खेळाडूंनी घेतला सहभाग
स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका वैशाली काळभोर, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल वहिले, बांधकाम व्यावसायिक संजय पुंडे, सामाजिक कार्यकर्ते रखमाजी हुच्चे, सिव्हील काँन्ट्रॅक्टर जंबु पुंडे, प्रशिक्षक प्रदीप कासार, पालक योगेश पवार यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेमध्ये 240 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, नगरसेवक प्रमोद कुटे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेवक मारूती भापकर, मच्छिंद्र तरस, सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे, मारूतीअण्णा पंद्री, अमित शिंदे, नितीन दुर्गे, सुनिल हरेल, बाबू शेट्टी, सोमनाथ अलंकार, दिवेश जैन, स्वप्नील वाघेरे यांच्या हस्ते झाले.
खेळाडुंना वाटचालीस शुभेच्छा
अविनाश काळे, स्वप्नील गायकवाड, रोहित जाधव, विशाल दौंडकर, मुकुंद मराठे, शिवतेज सावंत, विश्वतेज सावंत, तेजप्रताप पासवान, मनीषा दळवी, अनिता पांडे, छाया महामुलकर, सचिन किलारे, समीर देवकर, शिवानी वानखेडे, कोमल मराठे, शरद भोसले, चैताली मराठे, माधवी मांडवे, साक्षी गराडे, सचिन जाधव, विशाल पाडळे, संकेत पातरकर, वैष्णव सावंत, रोहित कुमावत, हेमंत कुमावत, राहुल गायकवाड यांनी पंचगिरी केली. कार्यक्रमाचे आयोजन प्रशिक्षक सागर पुंडे यांनी केले. पुंडे यांनी सर्वांचे आभार मानले व खेळाडुंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. फ्युचर ग्रुप ऑफ इंडिया यांचे विशेष सहकार्य लाभले.