पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना लावलेला शास्तीकर रद्द केला आहे. मात्र, काही मिळकतधारकांनी प्रामाणिकपणे शास्तीकर भरला आहे. ती रक्कम परत केली जावी, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीने केली आहे. पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत होवाळ, वैशाली राक्षे, दिनकर जाधव, विजय आराख, शेष पवार, एकनाथ जगताप, अॅड. सतीश कांबिये यांनी या संदर्भातील निवदेन महापलिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना दिले आहे.
राज्य शासनाने शहरातील शास्तीकर पूर्णपणे माफ केल्याचा अध्यादेश शुक्रवारी (दि.3) प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे शहरातील 1 हजार चौरस फुट आकारांच्या घरांसह बिगरनिवासी घरांचा शास्तीकर माफ होणार आहे. मात्र, 3 मार्च 2023 नंतरच्या अनधिकृत बांधकामांना पूर्वीप्रमाणे शास्तीकर लागणार आहे. मात्र, ज्या मिळकतधारकांनी प्रामाणिकपणे मूळ मिळकतकर व शास्तीकर भरला आहे. त्यांची ती संपूर्ण रक्कम परत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.