- सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
निगडी येथील माता अमृतानंद मठ शाळेसमोर एका बांधकाम व्यावसायिकाने अनधिकृत बांधकाम केले आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात खोदकाम करून मुरूम काढण्यात येत आहे. या अनधिकृत बांधकामाकडे महापालिकेच्या बीट निरीक्षकांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
त्या ठिकाणी नुकतेच बांधकाम सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. तेथील मुरूम काढून त्याची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. तेथे एका बाजूला विनापरवाना बांधकाम करण्यात आले आहे. अनधिकृत बांधकामाकडे पालिकेचे बीट निरीक्षकांनी दुर्लक्ष केले आहे. तसेच, जमीन उत्खनन प्रकरणी कारवाई केली जात नाही, असे काळभोर यांनी तक्रारीत म्हटले आहे.