पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
घरकुल क्रांती महासंघाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर बुधवारी (दि. 14) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. चिखली घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाला असून, गरजवंताला घरकुल प्रकल्पात घर मिळाले नाही. त्यामुळे यामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई करणाच्या मागरीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे, असे महासंघाचे अध्यक्ष उत्तम सकटे यांनी सांगितले.
घरकुल सोडतीमध्ये आधीच देवाण-घेवाण करून ज्यांना घर द्यायचे आहे, त्यांचीच यादी स्क्रीनवर लावली जाते. अपात्र लोकांना घरे देण्यात आली आहेत. राज्यातील नागरिकांना घरे देण्यासाठी ही योजना असताना धनाढ्य असलेल्या गुजराती व मारवाडी लोकांना लाभ देण्यात आला आहे. तसेच ज्यांना घरे देण्यात आली, त्यांच्या घरात त्यांचे नातेवाईक राहत आहेत. मूळ मालक दुसरीकडे राहत आहेत. या सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे, असे सकटे यांनी दिली.