पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागास सन 2023-24 या आर्थिक वर्षांत तब्बल 804 कोटी 69 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 कोटींने हे अधिकचे उत्पन्न आहे, असे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.
युडीसीपीआर 2020 नुसार प्रिमियम शुल्काद्वारे 443 कोटी 71 लाख जमा झाले आहेत. प्रशमन शुल्कापोटी 23 कोटी 13 लाखांचा भरणा झाला आहे. विकास शुल्क निधीतून 308 कोटी 31 लाख जमा झाले आहेत. टीडीआर हस्तांतरांतून 99 लाख आणिसुरक्षा शुल्कातून 8 कोटी 3 लाखांच रक्कम विभागाकडे जमा झाली आहे. असे एकूण 804 कोटी 69 लाख 40 हजार 397 रूपयांच उत्पन्न बांधकाम परवनागी विभागाकडून महापालिका तिजोरीत जमा झाले आहे. सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात या विभागास 950 कोटींच टार्गेट होते.