मुंबई : तिथीनुसार येणारी शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करा असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच त्यांच्या आवाजातील मनसेने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
या व्हिडिओमध्ये रायगड आणि राज्यातले इतर गड, किल्ले, दुर्ग यांचा वापर करीत शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्त्व दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मनसेच्या या व्हिडिओला खुद्द राज ठाकरे यांनीच आवाज दिला आहे.
मराठी बांधव गुढीपाढवा, दसरा व दिवाळी हे सण ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरी करतात त्याचपद्धतीने शिवजयंतीही साजरी केली पाहिजे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.