पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 1 हजार 149 रूग्ण बुधवारी (दि.2) आढळून आले. कोरोनाबाधित 809 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 38 हजार 196 रूग्ण ठणठणीत बरे झाले.
कोरोनाबाधितांची एकूण संख्या 52 हजार 294 झाली असून, सक्रिय 5 हजार 507 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तीन हजार 794 नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. तर, 3 हजार 468 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 2 हजार 224 नागरिकांचे अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 93 हजार 510 पैकी 1 लाख 39 हजार 979 नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान, काळेवाडी, भोसरी, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, निगडी, दिघी, रूपीनगर, रहाटणी, चिखली तसेच, खेड, चाकण, नाना पेठ, पुणे येथील रहिवाशी असलेले 15 रूग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 हजार 73 रूग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.