निर्भीडसत्ता न्यूज –
येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयातील बी. ए. प्रथम वर्षात वर्गातील विद्यार्थिनी रोहिणी मोहिते हिने नुकत्याच झालेल्या मकाऊ येथील ज्युनिअर एशियन ज्युडो स्पर्धेमध्ये ४० किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
शिवछत्रपती स्पोर्टस क्लब क्रीडा प्रबोधिनी पुणे येथे ती प्रशिक्षण घेत आहे. या क्रीडा प्रकारात मधुश्री देसाई तिच्या मार्गदर्शक आहेत. वयाच्या १२ व्या वर्षापासून ज्युडो या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. आतापर्यंत तिला अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी तिचे या यशाबद्दल तिचे कौतुक केले. महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रा. डॉ. पांडुरंग लोहोटे यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग यांनी तिच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन के