निर्भीडसत्ता न्यूज –
पुण्यामध्ये झालेल्या जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत भोसरी येथील माऊली स्पोर्टस फाउंडेशन संघाने यशस्वी कामगिरी करीत २५ सुवर्ण, १५ रौप्य व १८ कांस्यपदक जिंकले. स्पर्धा, सबज्युनिअर, कनिष्ठ व वरिष्ठ मुले व मुले असे विविध वजनी गटात झाली.
स्पर्धेत अर्णव लोंढे, प्रणव डोंबे, दिवाकर पिल्ले, साहिल लांडगे, रूपेश मोरे, सुमित गुप्ता, प्रफुल्ल करंजेकर, सिद्धार्थ भंजत्री, प्रवीण संधान, सोहम लोंढे, राजू घोडेकर, रोहित राऊत, चैतन्य पारखे, सागर मोहिते, सायली सांडूर, अनुष्का जगताप, श्रद्धा चौधरी, रिद्धी लांडगे, नेहा नरवडे, विजया पोळ, श्रद्धा घोडेकर, दिलीप थापा, प्रियंका मोहिते, सोनल लांडगे, स्वप्नील पवार यांनी आपआपल्या गटात सुवर्णपदक जिंकले.
शिवम काटकर, विशाल अनकलगी, अर्णव लोंढे, चैतन्य शेवकर, तन्मय आहिरे, प्रथमेश आहिरे, साक्षी कुरर्डा, सिद्धी लांडगे, भक्ती घोडेकर, प्राजक्ता कणसे, आदिराज हुंबरे, शिवम शेवकर, यश कुंभार, विघ्नेश होगाडे, चिन्मय बुचके यांनी आपआपल्या गटात रौप्यपदक संपादीत केले. कृष्णा पाटील, रूद्राण लोंढे, चिन्मय लोंढे, मंथन लोंढे, शुभम सांगडे, रिहान शेख, देवेश चौधरी, अभिषेक जगताप, चैतन्य बुचके, निरंजन लोंढे, राधिका लोंढे, आदिश्री लोंढे, अनुष्का बोत्रे, अश्विनी बोत्रे, सौम्या झा, कृष्णा चव्हाण, इशांत खाणवे यांनी आपआपल्या गटात कांस्यपदक मिळविले. या संघाचे नेतृत्व प्रिया बनकर-लोंढे यांनी केले.