निर्भीडसत्ता न्यूज । पिंपरी
दोहा, कतार येथे झालेल्या चौदाव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत हर्षवर्धन यादव याने रौप्यपदक जिंकले. त्याबद्दल त्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एक लाख रूपयांचा आर्थिक सहायाचा धनादेश शुक्रवारी (दि.24) सुपूर्त करण्यात आला.
महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर तथा क्रीडा समिती सभापती तुषार हिंगे यांच्या हस्ते यादव याला धनादेश देण्यात आला. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहायक आयुक्त संदीप खोत तसेच, नगरसेवक नीलेश बारणे, अभिषेक बारणे, राजू मिसाळ, शत्रुघ्न काटे, हर्षल ढोरे, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या क्रीडा धोरणानुसार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय केले जाते. त्यानुसार यादव याला आर्थिक सहाय करण्यात आले.