मेढा | निर्भीडसत्ता न्यूज
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ऐतिहासिक पवित्र वास्तूवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा जावली तालुक्याच्या वतीने करण्यात येत असून या भ्याड हल्ल्याची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन मेढा पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे, भारतीय बौद्ध महासभा जावली तालुका अध्यक्ष दशरथ कांबळे ,डॉ संपत नाना कांबळे, जिल्हा संघटक आनंदा कांबळे, युथ जिल्हा उपाध्यक्ष विकास जाधव, तालुका उपाध्यक्ष हेमंत गायकवाड, प्रवीण कांबळे, खजिनदार निलेश शिंदे, कार्याध्यक्ष सुशांत कांबळे, वसंतराव चव्हाण गुरुजी, संतोष चव्हाण, संजय कांबळे, नितीन जाधव, हिंदुराव भिसे, सुभाष माने, प्रशांत शिंदे, विशाल सपकाळ, विजय आप्पा शिंदे, सिध्दांत खरात, स्वप्नील बगाडे, महिला अध्यक्षा संगीता परिहार, मेघा गंगावणे, रेश्मा खरात आदी या वेळी उपस्थित होते.
मेढा पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राजगृह हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ निवासस्थान आहे. या निवासस्थानात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य होते. त्यामुळे राजगृह ही आंबेडकरी समाज्यासाठी पवित्र वास्तू आहे. मुंबईत दादरमधील राजगृह हे ग्रंथांसाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेली वास्तू आहे. जगभरातील आंबेडकरी अनुयायांचे राजगृह प्रेरणास्थान, ऊर्जास्थान आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू आणि पवित्र असणा-या राजगृह या वास्तूवर हल्ल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे.
एकनाथ रोकडे म्हणाले की, राजगृह ही आमची अस्मिता असून अशा समाजविघातक हल्लेखोरांना देशद्रोहाची शिक्षा झाली पाहिजे, या मागे नेमका कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी या हल्ल्याची स्वतंत्र पोलीस यंत्रणेनेमार्फत सखोल चौकशी करावी अन्यता आंबेडकरी समाज पेटून उठेल. सातारा जिल्ह्यात रिपाई जिल्हा अध्यक्ष अशोक (बापू) गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येईल अशा मागणीचे निवेदन मेढा पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, जावली तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय व धार्मिक मातृ संघटनेच्या वतीने रिपाई तालुका कार्यकारणी व जावली तालुक्यातील तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने या कृत्याचा जाहिर निषेध करण्यात येत आहे.